विजय मल्ल्याच्या जीवनावर मुलगा मालिका काढणार?

11

सामना ऑनलाईन । मुंबई

देशातील बँकांचा पैसा बुडवून फरार झालेला विजय मल्ल्याच्या जीवनावर आधारित असलेली मालिका छोट्या पडद्यावर येणार आहे. मद्यसम्राट विजय मल्ल्याचा मुलगा सिध मल्याच ही मालिका आणण्याच्या तयारीत आहे. हिंदुस्थानी जनतेसाठी खलनायक बनलेल्या विजय मल्ल्याच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या मालिकेतून त्याचाच मुलगा त्याला नायक म्हणून समोर आणणार आहे.

सध्या सिध आंतरराष्ट्रीय मालिकांसाठी काम करत आहे. शक्तिशाली आणि गुंतागुंतीच्या हिंदुस्थानी व्यावसायिकांच्या कुटुंबाभोवती फिरणारी मलिकेची कथा असू शकते. ही मालिका मल्ल्याच्या आता पर्यंतच्या एकंदरीत प्रवासावर आधारित असणार आहे. तसेच सिध देखील यामध्ये भूमिका साकारणार आहे. उद्योग जगतातील घडामोडींवर आधारित अशी ही मालिका असणार आहे. निर्माते पॉल काम्फ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती सिधने दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या