सिद्धार्थ काॅलेजच्या डागडुजीसाठी राज्य सरकारचा दोन कोटींचा निधी

137

फोर्टमधील मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या डागडुजीसाठी राज्य सरकारने 1 कोटी 99 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या स्थळांचा विकास, अनुसुचित जाती व नवबौध्द घटकासाठी ऐतिहासिक-सांस्पृतिकदृष्टय़ा महत्व असलेल्या स्थळांचा विकास करणे अशा विविध कामांच्या संदर्भात सामाजिक न्याय मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या बैठकीत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र व विधी महाविद्यालयाच्या (आनंदभवन) डागडुजीसाठी 1 कोटी 99 लाख 71 हजार 872 रुपये देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या