सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकतंय, मित्राने केला गंभीर आरोप

8947

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. तेव्हापासून या प्रकरणात आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू झालं आहे. आधी रियाने सुशांतच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. तर आता सुशांतचं कुटुंब रियाविरुद्ध जबानी देण्यासाठी दबाव आणत असल्याचं त्याच्या मित्राचं म्हणणं आहे.

हेही वाचा- मी व सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो – रिया चक्रवर्ती

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, सुशांत सिंह राजपूत याचा मित्र सिद्धार्थ पठानी याने वांद्रे पोलिसांना एक ईमेल केला आहे. त्यात सुशांतचे कुटुंबीय आपल्यावर रियाविरुद्ध खोटी जबानी देण्यासाठी दबाव टाकत आहेत, असं म्हटलं आहे. हा ईमेल वांद्रे पोलिसांना 28 जुलै रोजी मिळाला आहे. ईमेलमध्ये नमूद केल्यानुसार, सिद्धार्थ याला 22 जुलै रोजी एक कॉन्फरन्स कॉल आला होता. त्यात सुशांतचे मेहुणे, आयपीएस अधिकारी ओ. पी. सिंह, मीतू सिंह आणि एक चौथी व्यक्तीही होती. या कॉलमध्ये सिद्धार्थला सुशांतसोबत माऊंट ब्लँक सोसायटीत एका घरात राहत असताना रिया आणि सुशांत यांच्या खर्चांविषयी विचारणा करण्यात आली. हा कॉल 40 सेकंदात कट करण्यात आला आणि त्याची कोणतीही जबानी नोंदवण्यात आली नाही, असं सिद्धार्थचं म्हणणं आहे.

sushant-siddharth-pithani

हेही वाचा- SSR suicide – बिहार पोलिसांना मुंबईत तपासाचे अधिकार नाहीत! गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई

त्यानंतर 27 जुलै रोजी सिद्धार्थला पुन्हा ओ.पी. सिंह याचा फोन आला. त्यांनी सिद्धार्थला बिहार पोलिसांना रियाविरुद्ध खोटी साक्ष देण्याविषयी सांगितलं. तसंच त्याला पुन्हा एक कॉल आला. तो कॉल नीलोप्तल मृणाल नावाच्या व्यक्तिचा होता. ही व्यक्ती तीच आहे, जी बिहार पोलिसांसोबत दिसली होती. माझ्यावर अशा काही घटनांविषयी सांगण्यास दबाव आणला जात आहे, ज्याविषयी मला काहीच माहीत नाही, असं सिद्धार्थने ईमेलमध्ये नमूद केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या