सिद्धार्थ शुक्लाच्या रिलीज न झालेल्या गाण्यातील फोटो लिक, पाहा सिडनाझची जबरदस्त केमिस्ट्री

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे 2 सप्टेंबर रोजी सकाळी झोपेतच निधन झाले. त्याच्या निधनाने त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या आकस्मित जाण्याने त्याचे अनेक प्रोजेक्ट अर्धवट राहिले आहेत.

त्याचे व शेहनाझ गिल हिचे एक गाणे देखील लवकरच रिलीज होणार आहेत. त्या गाण्याच्या व्हिडीओतील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहते सिद्धार्थला पाहून भावूक झाले आहेत.

हॅबिट असे त्या म्युझिक अल्बमचे नाव असून यात श्रेया घोषालने गाणी गायली आहेत. ही गाणी सिद्दार्थ व शेहनाझवर चित्रीत करण्यात आली आहेत. या व्हिडीओतील बिहाईंड द सिनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यात शेहनाझ व सिद्धार्थने निळ्या रंगाचे कपडे घातले असून ते दोघे एकमेकांसोबत फारच सुंदर दिसत आहेत. गोव्याच्या कंडोलिम, अंजूना बीचवर हे फोटो शूट करण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या