नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेसवासी झाले

42

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

भाजपाचा हात सोडून पुढे काय करायचं याचा बराच काळ विचार केल्यानंतर अखेर नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यापूर्वी त्यांचं सतत तळ्यात मळ्यात सुरू होतं. सिद्धू यांच्या बायकोनं याआधीच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी आपने देखील त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात ते अयशस्वी झालेत.

rahul-and-siddhu

नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारीच सिद्धू काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचं घोषित केलं होतं. त्यामुळे त्यांचा काँग्रेस प्रवेश केवळ औपचारिकता उरली होती.

काँग्रेसने सिद्धू दांपत्याला प्रवेशापूर्वीच सांगितलं होतं की काँग्रेसमध्ये आल्यास दोघांपैकी फक्त एकालाच तिकीट दिलं जाईल. याला नवज्योतसिंग सिद्धू राजी झाला आहे. सिद्धू यांना अमृतसर किंवा जलालाबाद इथून निवडणूकीत उतरवलं जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अजून निर्णय झालेला नाहीये.

आपली प्रतिक्रिया द्या