पोटावर झोपण्याचे दुष्परिणाम

 

पोटावर झोपू नका…

  • पोटावर झोपणं आरोग्याला अपायकारक आहे. यामुळे शरीरात रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे स्नायूंना इजा पोहोचून ते दुखू शकतात.
  • पोटावर झोपल्याने पाठ दुखते. शिवाय पाठीच्या कण्याचा नैसर्गिक आकारही बदलू शकतो.
  • मणक्याला कर्व्ह येतो. मणक्याचे आजार वाढतात.
  • पोटावर झोपताना मान एका बाजूला मुरडली जाते. यामुळे डोक्यापर्यंत रक्तपुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे डोके दुखते. शिवाय मान आखडणे, मुरडणे अशा समस्या निर्माण होतात.
  • अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. कारण यामुळे अन्नपचनही योग्य पद्धतीने होत नाही.
  • चेहऱ्याच्या त्वचेला आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही, कारण पोटावर झोपल्याने चेहऱ्यावरही दाब पडतो. यामुळे मुरमांची समस्या वाढते.
  • सांधेदुखीची समस्याही निर्माण होऊ शकते, कारण यामुळे हाडेही योग्य पद्धतीत राहात नाहीत.
  • पोटावर झोपण्याची सवय असलेल्यांमध्ये अपस्मारीचा विकार आढळतो. अपस्मार हा मेंदूशी संबंधित आजार आहे. यामुळे फिटस् येतात.