जालन्यातील बदनापुरात राज्यपालांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निषेधार्थ जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल केलेले वक्तव्य हे बेताल असून हे वक्तव्य म्हणजे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचं काम ते करत आहेत, अशी खरमरीत टीका युवासेना जिल्हा समन्वयक भरत सांबरे यांनी केली.

यावेळी भरत सांबरे म्हणाले की, आम्ही लहानपणापासून राजस्थानी, मारवाडी, गुजराती समाजाच्या लोकांमध्ये राहिलो आहोत. आमचे पारिवारिक संबंध आहेत, मात्र असे बेताल वक्तव्य म्हणजेच मराठी माणसांचा व महाराष्ट्राचा अपमान आहे. यापूर्वीसुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सत्तेत मुख्यमंत्री असताना त्यांनी भारतीय जनता पक्षाची बाजू घेत वेगवेगळी वक्तव्ये केली. राज्यपाल हे संविधानिक पदावर असताना बेतालपणे विधाने करणे हे त्यांच्या खुर्चीला अशोभनीय आहे, असेही सांबरे म्हणाले.

युवा सेना बदनापूर मतदारसंघाच्या वतीने कोश्यारी यांना कोल्हापुरी चपला पाठवण्यात येणार असल्याचे सांबरे यांनी सांगितले. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात जोरदार घोषणाबाजी करून स्वाक्षरी बोर्डावर स्वाक्षऱ्या करून तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. यावेळी भरत सांबरे यांच्यासह राजेंद्र जऱ्हाड, सुनील बनकर, राहुल जऱ्हाड, उद्धव घणघाव, रवी मदन, प्रसाद चव्हाण, शिवाजी कऱ्हाळे, संजय बळप, भरत चोरमारे, अमोल शिंगारे, ऋषी थोरात, कृष्णा कडोस, कृष्णा कोल्हे, गजानन जगताप, प्रल्हाद भडांगे, गणेश लाहोटी, गणेश शिंगारे, अमोल पवार, रामेश्वर पितळे, प्रदीप कऱ्हाळे, गणेश चोरमारे, भागवत कऱ्हाळे, विजय जाधव, मनीष टाक, राधाकिशन जऱ्हाड, महावीर जैन, विजय बोडले, अमित मेहत्रे तसेच युवासेना प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.