अर्थ व्यवस्थेला थोडा दिलासा, जीएसटी संकलनात जूनमध्ये टक्का वाढला

630

कोरोनाचा अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. गेल्या वर्षीच्या तीन महिन्याच्या तुलनेत या वर्षी 41 टक्क्यांनी जीएसटी संकलन घटले आहे. मात्र अशा स्थितीत देखील दिलासादायक बाब म्हणजे एप्रिल मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात जीएसटी संकलनात वाढ झाली आहे.

जून महिन्यात केंद्र सरकारला 90 हजार 917 कोटींचा कर मिळाला आहे. मे महिन्यात केंद्र सरकारला 62 हजार 9 कोटी कर मिळाला होता. तर एप्रिल महिन्यात 32 हजार 294 कोटी कर मिळाला होता. लॉकडाऊन काळात एप्रिल आणि मे महिन्यातील जीएसटीचे आकडे जारी करण्यात आले नव्हते. आता जून महिन्यात हे आकडे जाहीर करण्यात आले आहेत.

जूनमध्ये केंद्र सरकारला 90 हजार 917 कोटी रुपये कर प्राप्त झाला आहे. त्यापैकी केंद्र सरकारचे 18 हजार 980 कोटी तर राज्यांचा 23 हजार 970 कोटी रुपये वाटा आहे. तसेच वस्तूंच्या आयातीवर सरकारला 40 हजार 302 कोटी रुपये कर मिळाला आहे. तसेच सेस मधून सरकारला 7 हजार 665 कोटी रुपये कर मिळाला आहे.

जीएसटीत घट

लॉकडाऊन दरम्यान जीएसटी संकलन कमी झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात 72 टक्क्यांनी जीएसटी कमी होऊन 32 हजार 294 कोटींवर आला आहे. तर मे महिन्यात 38 टक्क्यांनी घट होऊन 62 हजार 9 कोटीवर पोहोचला आहे. तिमाहीचा विचार केल्यास यंदा 41 टक्क्यांनी जीएसटी कमी आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या