अमेरिकेत वांशिक हिंसाचार सुरूच, गोऱ्यांचा शिखावर गोळीबार

41

सामना ऑनलाईन, वाशिंग्टन – वांशिक द्वेषातून अमेरिकेत दोन आठवड्यांपूर्वी हिंदुस्थानी इंजिनीयरची करण्यात आलेली हत्या आणि हिंदुस्थानी वंशाच्या दुकानदाराच्या गुरुवारी झालेल्या खुनाची घटना ताजी असतानाच आज वॉशिंग्टन येथे एका शीख व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. ‘तुझ्या देशात चालता हो’ असे दरडावत एका अज्ञात इसमाने दीप राय या शिखावर गोळी झाडली. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत.

दीप राय (३९) हे वॉशिंग्टनमधील केंट येथे आपल्या घरासमोरच कारची दुरुस्ती करत होते. तेव्हाच मास्क घातलेला एक तरुण तिथे आला आणि राय यांच्याशी नाहक हुज्जत घालू लागला. अखेर वादावादीत त्या तरुणाने ‘गो बॅक टू यूवर कंट्री’ असे दरडावत त्यांच्या दिशेने गोळी झाडली. ती गोळी हातावरच लागल्यामुळे राय हे थोडक्यात बचावले. त्यांच्यावर गोळीबार करणारा तरुण गौरवर्णीय आणि साधारण सहा फूट उंचीचा होता.

आपली प्रतिक्रिया द्या