भर मांडवात गर्ल फ्रेंडने नवरदेवाला धू धू धुतला

148

सामना ऑनलाईन। सिकरोडा

गर्लफ्रेंडला फसवून शेजारच्या तरुणीसोबत लग्न करणे उत्तराखंडमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. आपला प्रियकर गुपचूप भलत्याच तरुणीसोबत लग्न करत असल्याचे कळाल्यावर गर्लफ्रेंडने थेट विवाहमंडप गाठला. मंडपात प्रेयसी घुसल्याचे पाहून नवऱ्याची घाबरगुंडी उडाली. या प्रेयसीने फसवणूक करणाऱ्या तरुणाला जाम चोपला आणि त्याची कॉलर पकडून पोलिसांत नेले. तरुणाला लग्न लांब राहीले आता त्याच्याविरोधात फसवणूकीचा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा तरुण हरिद्वार येथील सिकरोडा भगवानपूर येथे राहतो. गेल्या तीन वर्षांपासून त्याचे एका तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. लग्नाचे आमिष दाखवत त्याने तिच्याशी शारिरीक संबंधही प्रस्थापित केले. पण गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वागण्यात बदल होत असल्याचे तरुणीच्या लक्षात केले. यामुळे तिने त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरूवात केली. याचदरम्यान, तो अचानक विकासनगर येथे गेल्याचे तिला कळाले. ही तरुणी त्याचा शोध घेत विकासनगर येथे येऊन धडकली. तेथे येताच समोरचे दृश्य बघून तिच्या संतापाचा भडका उडाला.

या तरुणीला तरुणाच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचे दिसले. लग्नाचा मोठा मांडव घालण्यात आला होता. मंडपात वऱ्हाडी मंडळीची गर्दी होती. महागडी शेरवानी घालून तो नववधूच्या बाजूलाच बसला होता. हे बघताच त्याच्या प्रेयसीची सटकली. तिने आपला मोर्चा थेट स्टेजकडे वळवला आणि त्याला चपलेने बडवायला सुरुवात केली. नववधूला आणि आलेल्या पाहुण्यांना हा काय प्रकार आहे ते कळेना. त्यांनी तरुणीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ती काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना गेल्या तीन वर्षांपासून हा तरुण आपली कशी फसवणूक करत होता याची कहाणी सांगितली. ते ऐकल्यानंतर उपस्थितांनी तिच्या पाठीशी उभं राहण्याचं ठरवलं. यामुळे नवरदेवाची भलतीच पंचाईत झाली. या तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या