रेशमी पेहराव

>> पूजा तावरे, फॅशन डिझायनर

कपाटात तळाशी गेलेल्या रेशमी साड्या थंडी येण्याची वाट पाहत असतात. पाहूया या रेशमी पेहरावाविषयी…

नोव्हेंबर संपत आलाय. थंडीला थोडी सुरुवात झाली आहे. ऋतू बदलला म्हणजे फॅशनमध्येही बदल होतो. हिवाळी फॅशन म्हटलं की समोर येतात ब्राइट आणि बोल्ड कलर्स. पूर्वी थंडी म्हटलं की टिपिकल स्वेटर्स, शाली आणि मफलर अशी फॅशन असायची. पण आता ट्रेण्ड बदलला आहे. उबदार कपडयांबरोबरच वैविध्यपूर्ण फॅब्रिक्समधील कपडयांच्या डिझाइन्सची चलती आहे. अनेक प्रकारात विंटरसाठी डिझाइन केलेले कपडे मिळू लागल्याने फॅशनेबल,युजफूल आणि ब्यूटीफुल हे तिन्ही हेतू साध्य होत आहेत.सध्या विंटरमध्ये सिल्क, शिफॉन व जॉर्जेट प्रकारातील कपडय़ांना विंटरमध्ये विशेष मागणी दिसून येते.

क्वीन ऑफ फॅब्रिक सिल्कची निवड ही नक्कीच या ऋतुसाठी उत्तम चॉईस ठरते. यामध्ये कांजीवरम, मुगा, इरी, टस्सर, बनारसी, बलुचारी, कोसा, बोमकाई, मैसुर, पैठणी, इरकल, पटोला यासारख्या असंख्य सिल्कच्या साडय़ांना पसंती दिसून येते. यामध्ये ट्रडिशनल लुकसाठी तुम्ही वायब्रंट कांजीवरम परिधान करू शकता. तसेच, सिंपल लुकसाठी तुम्ही इरकल सिल्क साडी वापरू शकता. सिल्क साडय़ा या नेसायला व कॅरी करायला सोप्या तर आहेतच, याशिवाय नॅचरल लुक व पार्टी यांसाठी या परफेक्ट चॉईस आहेत. वजनाने हलक्या असणाऱया साडय़ांनाच सध्या महिला जास्त प्राधान्य देत आहे. रिच लुकमुळे महिला वर्गाची याला पसंती मिळत आहे. सिल्कमधील वेगवेगळ्या रंगाचे रेशमाचे धागे साडीला वेगळाच लुक देतात. यामुळे उजेडात प्युअर सिल्क साडीचा रंग बदलतो. कधी त्यात सप्तरंगी छटाही झळाळतात. सिल्क साडीबरोबरच सिल्क डेसेस, टॉप, कुर्त्यांचीदेखील चलती दिसून येते.

हातमाग पारंपरिक, पुरातन कला, त्यावर नक्षीकाम केलेल्या अनेक विविध रंगी, कलाकृतीच्या साडय़ा, ड्रेस, टॉप्स्, पलाझो, ओढण्या असे खादीचे नवनवीन पेहराव, भरतकाम केलेल्या पर्सेस्, लीननच्या अनेक प्रकारातील पारंपारिक आकर्षक मऊसूत साडया विंटर सीझनसाठी नक्की घेऊ शकता.

जॉर्जेट व शिफॉनची फॅशन
कपडय़ांमध्ये शिफॉन व जॉर्जेट या दोन प्रकारांमध्येच साडय़ांपासून ते मॉडर्न डिझायनर ड्रेसेसपर्यंत याला मागणी दिसून येते. आकर्षक रंगामुळे याचा लुक अधिक खुलून दिसून येतो. लेस, स्टोन वर्क व रेशीम यांचा वापर अधिक आकर्षक दिसण्यासाठी केला जातो. शिफॉन हे हलके, नाजूक उभ्या लाईनमध्ये बनविलेले कापड म्हणजे शिफॉन तर जाड, दर्जेदार कपडा म्हणजेच जॉर्जेट,नायलॉन, शिफॉन असं चकाकणारं कापड आणि आतल्या बाजूने फर किंवा लोकरीचा उबदारपणा देणारी जॅकेटस् सध्या बाजारात आली आहेत. आकर्षकतेच्या दृष्टीने त्याचा चकाकता पॅटर्न तर उत्तम आहेच, त्याशिवाय थंडीत ट्रेकिंगला जाताना किंवा बाईक राईड करतानाही वापरण्यासाठी ही सोईची आहेत. लेदर, जीन्स ही उत्तम फॅशन स्टेटमेंट मिळवून देणारी कापडं असली, तर सध्या बाजारात आलेल्या लोकरीच्या आणि होजीअरीच्या जॅकेटस्नाही चांगलीच मागणी आहे. तसं पाहिलं तर शिफॉन आणि जॉर्जेट प्रकारांमध्ये साडीपासून ते मॉडर्न डिझायनर ड्रेसेसला पसंती मिळत आहे. आजकाल हेवी वर्क असणाऱया शिफान व जॉर्जेटच्या साडय़ा आणि सलवार सूटस्ची चलती आहे.