धूम्रपानाची सवय सोडवण्यासाठी साधे घरगुती उपाय

सामना ऑनलाईन । मुंबई

अनेकांना धूम्रपानाची सवय सोडायची असते, मात्र अनेक प्रयत्न करूनही ती सुटत नाही. कळतयं पण वळत नाही, अशी तक्रार या लोकांची असते. त्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र काही घरगुती उपाय तुम्हाला असलेली धूम्रपानाची सवय सोडवू शकतात.

हे उपाय करुन पाहा-
ओट्स – ओट्सच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी ओट्सचे सेवन करा.
मध – मधामध्ये व्हिटामिन्स, एन्झाईम्स आणि प्रोटीन्स असतात. धूम्रपानाची सवय सोडणाऱ्यांनी दररोज मधाचे सेवन करावे.
मुळा – मुळ्याचे मधासोबत सेवन केल्याचा अधिक फायदा होतो.
ज्येष्ठमध – ज्येष्ठमधाचे नियमित सेवन केल्याने धूम्रपानाची सवय कमी होते.

आपली प्रतिक्रिया द्या