स्वयंपाकघरातील सोप्या गोष्टी

102

सामना ऑनलाईन 

  • केळी जास्त दिवस ताजी ठेवायची असल्यास केळ्यांच्या घडाला देठाजवळ प्लास्टिकचा कागद गुंडाळून ठेवावा.
  • ऍसिडीटीसाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे निवळी. सकाळी एक चमचा निवळी प्यायची. चुन्याची टयूब आणून रात्री तांब्याभर पाण्यात पिळायची व ढवळून झाकून ठेवून द्यायची. सकाळी वरील थर बाजूला काढून आतील फक्त पाणी एका बाटलीत भरून ठेवायचे. हीच ती निवळी.
  • कोणतेही थेपले किंवा पराठे करतांना त्यात उकडलेला बटाटा किसून घालावा पराठे खुसखुशीत होतात.
  • पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी कणीक मळतांना तिच्यात थोडीशी तांदळाची पिठी घालून मळावी.
  • वाटणात मिरची घातली तर बाकीचे स्वाद लपतात. त्यापेक्षा आयत्यावेळी लाल तिखट घातले तर छान चव येते. शिवाय आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करता येते.
  • प्लॉवर शिजवतांना त्यात दूध व किंचित मीठ घालून शिजवावे म्हणजे प्लॉवर पांढरा शुभ्र व तजेलदार रहातो.
  • इडल्या हलक्या आणि चांगल्या होण्यासाठी पिठात मूठभर कुरमुरे घालून वाटायचे.
आपली प्रतिक्रिया द्या