इजिप्तमध्ये मशिदीवर हल्ला; २३५ ठार

फाईल फोटो

सामना ऑनलाईन । कैरो

इजिप्तमधील उत्तर सिनई प्रांतात दहशतवाद्यांनी एका मशिदीवर केलेल्या हल्ल्यात २३५ ठार आणि १०० जण जखमी झाले आहेत. हल्ल्याचे स्वरुप पाहता, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

अल-अरिश शहरातील अल-आबेद भागात अल-रावडा ही मुख्य मशीद असून या मशिदी नमाजाच्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. बॉम्ब फेकून आणि अंदाधुंद गोळीबार करुन दहशतवाद्यांनी हल्ला केला.

हल्ल्याचे वृत्त कळताच राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी यांनी तातडीने उच्चस्तरिय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुरक्षेशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या