सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यात येणार आहे. आज मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले होते.