समाजसेविका सिंधुताई सकपाळ यांच्या कारला अपघात

सामना ऑनलाईन । जालना

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कारला आज सोमवारी पहाटे जालना संभाजीनगर रस्त्यावर नागेवाडी नजिक किरकोळ अपघात झाला, सुदैवाने यात सिंधुताई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

सोमवारी पहाटे पुण्याहून वर्ध्याला एका कार्यक्रमासाठी जात असताना सिंधुताई यांच्या इनोव्हा गाडिला अपघात झाला, पहाटे साडेचार च्या सुमारास जालना शहराजवळील नागेवाडी जवळ खासगाव फाट्यावर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकी एका स्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना सिंधुताई ची गाडी रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र कारचे नुकसान झाले. अपघातानंतर पोलिसांनी सिंधुताई यांना दुसऱ्या गाडीतून रवाना केले.