संगीत आणि भक्ती

28

शास्त्रीय गायक आनंद भाटे. दगडूशेट हलवाई गणपती सोबतच पं. भीमसेनजी त्यांचे दैवत.

संगीत आणि भक्ती यांचा खूप जवऴचा संबंध आहे. कोणत्याही संगीतात भक्ती आणि भाव यायलाच हवा. तरच ते श्रोत्यांपर्यंत पोहोचू शकतं. शास्त्री संगीतातला विलंबित ख्याल जरी गायला तरी तो स्वर लगावातून प्रगट व्हायला हवा.

> देव म्हणजे? – जग चालवणारी शक्ती, ऊर्जा. माहीत असलेलं मूर्त किंवा अमूर्त स्वरूप.

> आवडते दैवत? – पुण्याचा दगडू हलवाई गणपती. खूप लहानपणी आई-बाबा तिथे घेऊन जायचे.

> धार्मिक स्थळ? – आषाढी एकादशीला पंढरपूरला जाण्याचा योग आला. तिथे संगीतसेवा केली.

> आवडती प्रार्थना पसायदान

> आवडतं देवाचं गाणं? – पंडित भीमसेनजींचं तीर्थ विठ्ठल…

> शुभ रंग? – लाल

> दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – दैवी शक्ती काहीही घडवू शकते. या दृष्टीने अंधश्रद्धा, बुवाबाजीवर विश्वास नाही.

> काय केल्यावर समाधान मिळतं? – मनासारखे सूर लागतात किंवा मनासारखं गाणं होतं की, समाधान मिळतं.

> देवावर किती विश्वास आहे? – पूर्ण विश्वास आहे.

> दुःखी असता तेव्हा? – देवाला प्रार्थना करतो.

> नास्तिक लोकांबद्दल काय सांगाल? – प्रत्येकाची आपली निवड असते.

> देवभक्त असावं पण देवभोळं नसावंतुमचं मत काय? – माणसाने अंधश्रद्धाळू नसावं. विज्ञानाच्या पलीकडेही दैवी शक्ती आहे याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.

> ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास आहे ? – हे एक विज्ञान आहे. ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करणारं ते एक शास्त्र आहे. माझा अभ्यास नाही, पण ते पूर्ण थोतांड आहे असंही नाही म्हणता येणार.

आपली प्रतिक्रिया द्या