‘बंदा लई जोरात, बाळासाहेब थोरात’, अवधूत गुप्तेंच्या गिताने संगमनेरात धमाल

920

‘‘इस बंदेमे है कुछ बात, ये बंदा लई जोरात
बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात’’

या गीतासह महाराष्ट्रातील लोकप्रिय संगीतकार व गायक अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या विविध मराठमोळया गीतांना तरुणांनी टाळ्यांच्या व शिट्यांच्या गजरात साथ दिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सवात यशोधन मैदान येथे सुप्रसिध्द गायक अवधूत गुप्ते यांचा जल्लोष 2020 हा लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रम झाला. यावेळी आमदार डॉ.सुधीर तांबे, अ‍ॅड.माधवराव कानवडे, शिवाजीराव थोरात, कांचनताई थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्राचे रॉकस्टार अवधूत गुप्ते यांनी गायलेले झेंडा चित्रपटातील ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’ या गाण्याने व्यासपीठावर धमाकेदार आगमन केले. बाई बाई मनमोहराचा कसा पिसारा फुलला, जिथे – तिथे रुप तुझे दिसू लागले या गितांनी धमाल केली. तर डिचपारी डिपांग काळी माती निळ पाणी हिरवा शिवार या गितावर अबाल वृध्दांसह महिलांनी ही ठेका धरला. तर तरुणांच्या आग्रहास्तव झालेले ‘‘इस बंदेमे है कुछ बात ये बंदा लई जोरात बाळासाहेब थोरात, बाळासाहेब थोरात”, या गितावर उपस्थित प्रत्येकाने ताल धरला. शिट्या,टाळयांच्या गजराने यावेळी परिसर दुमदुमून गेला.

avdhut-gupte1

अवधूत गुप्ते यांनी शेतकरी आत्महत्येवर सादर केलेल्या ‘‘पत्रास कारण की, बोलण्याची हिंमत नाही, पावसाची वाट बघण्यात आता काही गंमत नाही’’ या गिताने प्रत्येकाच्या डोळयात अश्रू आले. प्रार्श्‍वगायिका जान्हवी प्रभू अरोराने यांनी गायलेली ‘‘ईमेल काल इंटरनेटवर केला’’ या लावणीने धमाका उडवून दिला. तर कौस्तूक गायकवाड यांनी गायलेले ‘‘आम्ही लग्नाळू’’ या गिताला तरुणांनी उत्स्फुर्त दाद दिली.

आपली प्रतिक्रिया द्या