प्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा भीषण अपघातात मृत्यू

6347

सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाशिकच्या गायिका गीता माळी (40) यांचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून नाशिकला परतताना गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे पती अॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे.

गीता माळी या मागील दीड महिन्यांपासून अमेरिकेत कार्यक्रमानिमित्त गेल्या होत्या. गुरुवारी सकाळीच त्या परत आल्या होत्या. मुंबईतून नाशिकला परतत असताना मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर शिवारात एकता हॉटेलसमोर कार आणि टँकरची धडक होऊन हा अपघात झाला. गीता माळी यांचा यात मृत्यू झाला, तर त्यांचे पती विजय माळी यांच्यावर शहापूर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

geeta-mali-singer1

गाती माळी यांनी आपल्या गायणाच्या कलेने नाशिकसह मुंबई, पुणे, दिल्ली आणि थेट अमेरिकेत ठसा उमटवला. गुरुवारी सकाळीच त्या मायदेशी परतल्या होत्या. विमानतळाहून नाशिकला परतत असताना महामार्गावर हा अपघात झाला. गीता माळी यांचे गायनाचे देश विदेशात अनेक कार्यक्रम झाले आहेत. त्यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या