माझा आवडता ‘बाप्पा’ – हृषिकेश रानडे

गायक हृषिकेश रानडे. गणपती बाप्पा त्याचे लाडके दैवत. तो मित्र…सखा…

* तुमचं आवडतं दैवत? ः गणपती बाप्पा

* त्याचं कौतुक कशा पद्धतीने करायला आवडतं? ः मी दररोज गणपतीला नमस्कार, प्रार्थना करूनच झोपतो.

* संकटात तो तुम्हाला कशी मदत करतो असं वाटतं? ः गणपती बाप्पाची मला कायमच मदत आहे. त्याने खूप दिलंय.

* तुमच्यातली कला साकारण्याकरिता त्याची कशी मदत होते? ः एक प्रेरणा म्हणून त्याच्याकडे बघावं.

* आवडत्या दैवताला प्रार्थना केल्यावर यश मिळालंय, असा प्रसंग? ः मी सारेगम जिंकलो, श्रेया घोषाल यांच्याबरोबर केलेल्या कॉन्सर्ट. यावेळी लागणारी ताकद प्रार्थनेने येते.

* त्याच्यावर रागावता का? ः नाही.

* देवबाप्पा तुमचे लाड कसे पुरवतो? ः त्याने भरभरून दिलंय. हे त्याचे लाडच.

* त्याचे कोणते स्वरूप आवडते? ः कोणतेही.

* त्याच्यापाशी काय मागता? ः माझं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ ठेव असं सांगतो..

* तुम्ही त्याच्या आवडीचा नैवेद्य काय करता? ः मोदक

* त्याची नियमित उपासना कशी करता? ः कायम शरणागत राहण्याचा प्रयत्न करतो. रात्री प्रार्थना करूनच झोपतो.