वसईच्या जिज्ञेशला हवाय आशीर्वाद

71

सामना ऑनलाईन, वसई – जिज्ञेश वझे… वसईतला हा एक उदयोन्मुख गायक… कलर्स वाहिनीवर सध्या सुरू असलेल्या ‘दी रायझिंग स्टार’ या सिंगिंग रिऑलिटी शोमध्ये तो सहभागी झाला आहे. त्याची कला पाहून परीक्षक व कलर्स वाहिनी दोघेही खूश झालेत, पण प्रेक्षकांची मते कमी मिळाल्यामुळे त्याला शोमधून बाहेर व्हावं लागलं. मात्र परीक्षकांनी त्याला आणखी एक संधी दिली आहे. आता त्याला प्रेक्षकांचा भरभरून आशीर्वाद हवाय. ‘कलर्स टीव्ही ’ हे ऍण्ड्रॉइड ऍप मोबाईलवर डाऊनलोड करून बहुमूल्य मत द्या, असं आवाहन जिज्ञेशने प्रेक्षकांना केलंय. महाराष्ट्राचा झेंडा फडकत ठेवायचा तर प्रेक्षकांनीही त्याला भरभरून आशीर्वाद द्यायला हवा हे खरेच.

प्रसिद्ध संगीतकार-गायक शंकर महादेवन यांनीही जिज्ञेशबद्दल बोलताना ‘महाराष्ट्र आणि मी तुझ्यावर प्रेम करीन. अभंगवाणीची आठवण करून दिलीस’, अशी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातून, त्यातही ठाणे, पालघरमधून निवड झालेला जिज्ञेश हा एकमेव स्पर्धक आहे. केवळ कमी मतांमुळे तो बाद होऊ नये, अशी त्याच्या पालकांची आणि गुरूंची इच्छा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या