गेल्या 24 तासात 61 हजाराने वाढले रुग्ण, मृतांचा आकडाही वाढला

1089

गेल्या 24 तासात देशात देशात 61,537 कोरोनाग्रस्त आढळून आले असून 933 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसातील कोरोनाग्रस्त व मृतांच्या आकड्यातील ही सर्वात मोठी वाढ आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

गेल्या 24 तासात झालेल्या वाढीनंतर देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20,88,611 झाला आहे. त्यातील 6,19,088 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 14,27,005 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. देशातील एकून मृतांचा आकडा 42,518 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशात 5,98,778 चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतच्या चाचण्यांचा आकडा दोन कोटींच्या पुढे गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या