समृद्धी महामार्गावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फिरू देणार नाही, सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा

शिंदे-फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होऊ देणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या महामार्गावर फिरू देणार नाही, असा इशारा नाशिक जिह्यामधील सिन्नर तालुक्यातील शेतकऱयांनी दिला आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग वाहनांसाठी लवकरच खुला करण्याची घोषणा मध्यंतरी एकनाथ शिंदे यांनी केली होती. पहिल्या टप्प्यात नागपूर-शिर्डी महामार्ग 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर सुरू करण्याचे नियोजन होते. मात्र बऱयाच ठिकाणी रस्त्याची कामे अपूर्ण असल्याने पावसाळ्यात शेतकऱयांना याचा मोठा फटका बसला आहे. सिन्नर तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती वाया गेल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत समृद्धी महामार्गाचे उद्घाटन होऊ देणार नाही, असा इशारा शेतकऱयांनी दिला आहे.

महाराष्ट्राच्या समृद्धीचा राजमार्ग म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग शेतकऱयांसाठी बरबादी करणारा ठरू पाहत आहे. यंदाच्या खरीप हंगामात पिके जोमात उभी असताना समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा असणाऱया शेतांमध्ये महामार्गावरून वाहत येणारे पाणी साचत असल्याने या पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत संबंधित ठेकेदार कंपनी व अधिकाऱय्aाांना वारंवार विनवण्या करूनही दुर्लक्ष होत असल्याने सिन्नर तालुक्यातील वावी येथील शेतकऱयांनी सहकुटुंब उपोषणास बसण्याचा इशारा आहे.