सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमधील दोन रुग्ण कोरोनामुक्त

reliance

जगभरात सध्या कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. हिदुस्थानातही कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर देशाने कोरोनाविरोधात लढण्याची तयारी सुरू केली. कोरोनाविरोधातील या लढ्यात मरोळ येथील सर एचएन रिलायन्स फाऊंडेशनचे सेव्हलहिल हॉस्पिटलही सहभागी झाले. महत्त्वाचे म्हणजे आता या रुग्णालयातील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यातील एकजण 68 वर्षांचे असून ते पेशाने डॉक्टर आहेत. ते मालाडमध्ये जनरल फिजशियन म्हणून कार्यरत आहेत. तर दुसरे पोलीस हेड कॉन्स्टेबल आहेत. ते कल्याणमध्ये राहत असून 51 वर्षांचे आहेत. त्यांनी या हॉस्पिटलच्या मदतीने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनावर मात करणाऱ्या या दोघांनी सेव्हनहिल हॉस्पिटलचे आभार मानले आहेत.

जनरल फिजिशियन असणाऱ्या डॉक्टरांना 20 मार्चला कोरोनाची लक्षणे आढळल्यावर 20 मार्चला त्यांनी स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना पाय दुखणे आणि ताप जाणवू लागला. श्वास घेण्यास त्रास झाल्यावर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर ते मरोळमधील सेव्हनहिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सुरक्षेसाठी त्यांचे कुटुंबिय आणि क्लिनीकमधील कर्मचाऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. रुग्णालयात 16 दिवस आयसोलेशनमध्ये काढल्यानंतर त्यांना 14 एप्रिलला डिर्चार्ज देण्यात आला. या 16 दिवसांच्या काळात हॉस्पिटलमधील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची काळजी घेतली. त्यांच्या कटुबियांना दिवसातून दोनदा त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात येत होती. आयोसलेशनचा काळ मानसीकदृष्टा रुग्णासाठी खडतर असतो. कुटुंबिय जवळ नसतात. त्यांना बघताही येत नाही. एवढेच नाही तर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा चेहराही बघता येत नाही. व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबीय त्यांच्या संपर्कात होते. या सर्वांवर मात करत ते कोरोनामुक्त झाले आहेत.

त्याचप्रमाणे कल्याणमध्ये राहणाऱ्या 51 वर्षांच्या जीआरपी हेड कॉन्स्टेबलनेही कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कामावर असताना त्यांना ताप आला. त्यामुळे ते फॅमेली डॉक्टरकडे गेले. चार पाच दिवसांनी त्यांना खोकला येण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना भायखळ्याच्या कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची तपासणी केली असता रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सेव्हनहिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांना 10 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या मुलालाही तीन दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. 15 एप्रिलला त्यांना डिस्चार्च देण्यात आला आहे. घरी परतल्यावर शेजाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.

आपली प्रतिक्रिया द्या