मोफत दारू, मोफत मेकअप किट, 20 रुपये लिटर पेट्रोल; या उमेदवाराचा जाहीरनामा चर्चेचा विषय

निवडणुकीतील नेत्यांच्या आश्वासनांबद्दल तुम्ही खूपवेळा ऐकले असेल, पण आता आम्ही तुम्हाला एक असा जाहीरनामा दाखवणार आहोत, ज्या जाहीरनाम्यात एका उमेदवाराने दिलेली आश्वासने पाहून तुमचे डोके चक्रावून जाईल. निवडणुका जवळ आल्या की राजकारणी अनेक आश्वासने देतात. त्यातील काही आश्वासने पूर्ण होतात, तर काही आश्वासने पूर्ण होत नाहीत. जयकरण लथवाल हे उमेदवार सिरसाड गावच्या सरपंचपदासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी त्यांनी जनतेला काही मजेशीर आश्वासने दिली आहेत. या जाहीरनाम्याचे बॅनर त्यांनी गावभर लावले आहेत. त्यांचा जाहीरनामा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जयकरण यांनी दिलेली आश्वासने खालीलप्रमाणे

गावात रोज सरपंचांचा मन की बात कार्यक्रम
गावात तीन विमानतळ बांधणार
महिलांसाठी मोफत मेकअप किट
सिरसाडमध्ये पेट्रोल 20 रु लिटर
जीएसटी बंद करणार
गॅसचा दर 100 रुपये प्रति सिलींडर
प्रत्येक कुटुंबासाठी एक दुचाकी मोफत
सिरसाड ते दिल्ली मेट्रो मार्ग
खालून वीज लाइन आणि वरून पाइपलाइन
मोफत वाय-फाय सुविधा
सिरसादच्या तरुणांना सरकारी नोकऱ्या
दारुड्यांना दररोज एक दारूची बाटली
सिरसाड ते गोहाना दर 5 मिनिटांनी हेलिकॉप्टरची सुविधा

सिरसाडच्या या सरपंचाच्या निवडणुकीसाठी दिलेल्या आश्वासनांवर सोशल मीडिया यूजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ही सिरसाडची निवडणूक आहे की जगाची. तर दुसऱ्या युजरने लिहिले की, अप्रतिम आहे भाऊ, अशी आश्वासने कोण देतो?

या निवडणुकीच्या आश्वासनाचा फोटो @arunbothra नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत ६ हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केले आहे. त्याच वेळी, 800 हून अधिक लोकांनी या विचित्र जाहीरनाम्याची पोस्ट रिट्विट केली आहे. जयकरण लथवाल यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पेट्रोलपासून ते मेट्रो आणि विमानतळापर्यंतची आश्वासने दिली आहेत. एवढेच नाही तर उमेदवाराने जीएसटी रद्द करण्याचे आश्वासनही दिले आहे. त्यामुळे हा जाहीरनामा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.