रोख बाळगण्याची मर्यादा १ कोटी रुपयांवर आणा : एसआयटीची सूचना

47

सामना ऑनलाईन | अहमदाबाद

नागरिकांसाठी रोख बाळगण्याची मर्यादा १ कोटी रुपयांवर आणावी अशी सूचना काळ्या पैशांवरील तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने ( एसआयटी ) केंद्र सरकारला केली आहे. या आधी ही मर्यादा २० लाख रुपये असावी अशी शिफारस एसआयटीने केली होती.

एसआयटी प्रमुख निवृत्त न्यायमूर्ती एम बी शाह यांनी गुरुवारी स्पष्ट केले की,जप्त केलेली रोकड सरकारी तिजोरीत जमा व्हायला हवी. आता सापडणारी अवैध रोकड प्रचंड असल्याने रोख जवळ बाळगण्याची मर्यादा किमान १ कोटी व्हायला हवी. जप्त केलेली रोकड १६० कोटी अथवा १७७ कोटी रुपये असेल तर पूर्वीची २० लाखांची मर्यादा अतिशय कमीच वाटते.

विद्यमान कायद्यानुसार सध्या जप्त झालेली रक्कम ४० टक्के आयकर आणि दंड भरून परत दिली जाते. पण नुकत्याच आयकर अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधणाऱ्या एका कंपनीच्या अनेक ऑफिसेसवर धाडी घालून १६० कोटीची रोकड आणि १०० किलो सोने जप्त केले होते. त्याचा हवाला एसआयटीप्रमुख न्यायमूर्ती शाह यांनी दिला आणि रोकड जवळ ठेवण्याची मर्यादा वाढवण्याची सूचना सरकारला केली.

आपली प्रतिक्रिया द्या