Photo – लेहेंग्यात खुलले मृणाल ठाकूरचे सौंदर्य, पाहा मनमोहक अदा

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ‘सीता रामम’ अभिनेत्री मृणालचे सुंदर एथनिक लूक पाहायला मिळाले. सध्या तिचे हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर अलिकडे आपला दाक्षिणात्य सिनेमा ‘सीता रामम’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 5 ऑगस्टला प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात मृणालसोबत दलकीर सलमान आहे.

सिनेमाच्या प्रमोशना दरम्यान तिने इंस्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.  

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूरने आयवरी रंगाचा लेहेंगा घातला आहे. या लेहेंग्यावर मोकळे केस आणि चेहऱ्यावर ग्लॉसी मेकअप करुन लूक पूर्ण केला आहे. मृणाल ठाकूरचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये गणले जाते ज्यांनी कमी वेळात इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मृणाल याआधी कुमकुम भाग्य या मालिकेत होती. मालिकेतील बुलबुलच्या भूमिकेला लोकांनी खूप पसंती दिली.मृणालचा टिव्हीपासूनचा बॉलीवूडपर्यंत उडी घेण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली आहे.