सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव

राज्याचे मुख्य सचिव म्हणून सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली आहे. मुख्य सचिव पदासासाठी प्रवीण परदेशी यांचेही नाव चर्चेत होते. पण सीताराम पुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सीताराम कुंटे यापूर्वी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहत होते. आता सीताराम कुंटे यांची यांच्या जागी मनुपुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती झाली आहे. सीताराम कुंटे पुढील नऊ महिन्यांपर्यंत राज्याच्या मुख्य सचिवपदावर राहू शकतील. या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होतील. सीताराम कुंटे हे 1985 च्या तुकडीचे सनदी अधिकारी आहेत. त्यांना प्रशासकीय सेवेचा 36 वर्षांचा अनुभव आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

दरम्यान, विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्या रविवारी सह्याद्री अतिथीगृहात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीला मावळते मुख्य सचिव संजय पुमार उपस्थित राहतील. त्यानंतर सोमवारी सकाळी पुंटे हे संजय पुमार यांच्याकडून मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील.

आपली प्रतिक्रिया द्या