प्रवासी बसवर पडली हायव्हॉल्टेज तार, सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

राजस्थानमधील जलोर येथे एका प्रवासी बसवर हायव्हॉल्टेज तार पडल्याने त्या बसने पेट घेतला. या दुर्घटनेत 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. जखमींना जोधपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे.

बसमधील सर्व प्रवासी हे अजमेर शहरातील असून ते बारनेर येथील जैन मंदिरातून गुगल मॅपवरून अजमेरसाठी शॉर्ट कट शोधून त्या रस्त्यावरून जात असताना ही दुर्घटना घडली. त्यांनी एका अगदी निमुळत्या रस्त्यावरून बस नेली. त्यावेळी या बसवर एक हायव्हॉल्टेज तार पडली. त्यानंतर बसने तत्काळ पेट घेतला. रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडल्याने बरेच प्रवासी झोपेत होते. अचानक बसने पेट घेतल्याने बसमध्ये एकच गोंधळ झाला व सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या