कोंडअसुर्डे येथील बंद घर फोडून सहा लाखांची घरफोडी

राष्ट्रीय महामार्गापासून जवळ असलेल्या कोंड असुर्डे जांभुळवाडी येथील बंद असलेले घर फोडून अज्ञात चोरट्याने सहा लाखांची चोरी केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना शुक्रवारी रात्री ते रविवार सकाळच्या दरम्यान घडली .

याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यात डॉ. तानाजी सदाशिव दौंड (रा . कोंड असुर्डे ) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ . दौंड कुटूंबीय घर बंद करून नातेवाईकांकडे गेले होते. बंद असलेल्या घरात प्रवेश करीत कोणत्या तरी कठीण हत्याराने लोखंडी कपाट तोडून त्यामध्ये ठेवलेले 1 लाख 60 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र ,आणि इतर सोन्याचे दागिने रोख रक्कम अशी सुमारे 5 लाख 97 हजारांची चोरी झालेली आहे . सासुरवाडीतून रविवारी घरी आल्यानंतर कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे समजताच पोलिसांना कळविले . संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनी घटनास्थळी जावून पहाणी केली आणि पंचनामा करुन अज्ञात चोरट्या विरुध्द संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे .

आपली प्रतिक्रिया द्या