नगरमधील दारूकांडप्रकरणी नऊ अधिकारी निलंबित

53

सामना ऑनलाईन, मुंबई

नगरमधील पांगरमल येथील अवैध दारूकांडप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या सहा अधिकाऱ्यांना तर तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह नऊ जणांना निलंबित करण्यात आले आहे. उत्पादन शुल्कच्या या अधिकाऱ्यांमध्ये संजय पांडुरंग, बाबासाहेब पगारे, वसंत व्यवहारे, बाबासाहेब करंजुले, स्विटी राठोड, विद्या आव्हाड यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस विभागातील अर्चना खरपुडे, भानुदास बांदल आणि आदिनाथ गांदले यांचेही निलंबन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नगर जिल्हा रुग्णालयातील कॅण्टीनमध्ये अवैधरीत्या दारू प्यायल्याने १३ फेबुवारी रोजी ८ जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडीत रिकाम्या बाटल्या जप्त केल्या होत्या. याच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालानुसार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांविरोधात विभागीय चौकशीची तक्रार करण्यात आली, मात्र या चौकशीत अधिकाऱ्यांचा सहभाग नसल्याचे समोर आले. याप्रकरणी कॅण्टीनचा परवाना रद्द करून इमारतीचा ताबा घेण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या