बीड जिल्ह्यात वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू

38

सामना ऑनलाईन । बीड

परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात धुमाकूळ घातला आहे. शनिवारी सायंकाळी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील चारदर येथे वीज कोसळून पाच जणांचा, तर माजलगाव तालुक्यात एका महिलेचा मृत्यू झाला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे झाडाचा आश्रय घेतलेल्या दहा जणांवर वीज कोसळली. यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

शनिवारी दुपारपासून बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि धारूर तालुक्यातील चारदरी येथे अचानक अंधारुन आले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कोसळणाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आश्रय घेतलेल्या १० जणांवर वीज कोसळली. यात आसाराम रघुनाथ आघाव (२८), उषा आसाराम आघाव (२५), दिपाली मच्छींद्र घोळवे (२१), शिवशाला विठ्ठल मुंडे (२१), वैशाली संतोष मुंडे (२५) या पाच जणांचा जागीत मृत्यू झाला. तर सुमन भगवान तिडके (४५), रुक्मिण बाबासाहेब घोळवे (५२), कुसाबाई नामदेव घोळवे (४५), सिताबाई दादासाहेब घोळवे (२५), सुरेखा आबासाहेब आघाव (१७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माजलगाव तालुक्यातही एका महिलेचा वीज कोसळून मृत्यू झाला. राधाबाई दामोधर कोळसे (५५) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

आपली प्रतिक्रिया द्या