IPL 2020 – आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळलेले 6 खेळाडू, एकाने तर 8 संघ बदलले

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत अगदी सुरुवातीपासून खेळणाऱ्या काही मोजक्या खेळाडूंची आपण माहिती घेतलीच आहे. आज आपण आयपीएलमध्ये सर्वात जास्त संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंबाबत जाणून घेऊ. हे खेळाडू 6 किंवा त्याहून अधिक संघाकडून खेळताना दिसले आहे. यातील एका खेळाडूने तब्बल 8 वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

1. ऍरॉन फिंच (Aaron Finch)

images-8
आयपीएलमध्ये सर्वाधिक संघाकडून खेळणारा ऍरॉन फिंच एकमेव खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाच्या या 33 वर्षीय खेळाडूने 8 वेगवेगळ्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2020 हा आयपीएल खेळाडू रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात आहे. फिंच 2010 ला राजस्थान रॉयल्सच्या संघात होता, त्यानंतर दिल्ली डेअरडेव्हील्स (आता दिल्ली कॅपिटल्स), रायजिंग पुणे सुपरजायंट्स, सनरायझर्स हैद्राबाद, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबकडून संघाचेही नेतृत्व केले.

2. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)

images-9
कोलकाता नाईट संघाचा कर्णधार दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये 6 संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2008 पासून कार्तिक प्रत्येक सिझन खेळलेला खेळाडू आहे. 2008 ला दिल्लीच्या संघात असणाऱ्या कार्तिकने यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लायन्स असा प्रवास केला. 2018 पासून हा 35 वर्षीय खेळाडू केकेआरकडून खेळत आहे.

IPL 2020 – कल भी, आज भी..! पहिल्या सिझनपासून खेळताहेत ‘हे’ 10 खेळाडू

3. पार्थिव पटेल (Parthiv Patel)

images-10
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेल हा देखील कार्तिकप्रमाणे 6 संघाकडून खेळला आहे. तसेच 2008 पासून आयपीएल खेळणाऱ्या मोजक्या खेळाडूतही त्याचे नाव आहे. 2008 ला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पदार्पण केलेला पार्थिवने पुढे कोची टस्कर्स केरळा, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैद्राबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2020 ला तो पुन्हा चेन्नईच्या संघात आला आहे.

4. इशांत शर्मा (Ishant Sharma)

cricket_172272baaa1_medium
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याचीही या यादीत वर्णी लागली आहे. 2008 ला कोलकाता नाईट संघाकडून खेळलेला इशांत शर्मा 2011 ला डेक्कन चार्जर्स संघात गेला. यानंतर सनरायझर्स हैद्राबाद, रायजिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला. 2020 च्या आयपीएलला तो होम टीम दिल्ली कॅपिटल्स संघात आला आहे.

5. थिसारा परेरा (Thisara Perera)

images-11
श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा सहा संघाकडून खेळणारा दुसरा विदेशी खेळाडू आहे. 2010 ते 2016 या काळात तो चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स केरळा, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैद्राबाद आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स या 6 संघाकडून खेळताना दिसला. मात्र 2016 पासून तो एकदाही आयपीएल खेळताना दिसलेला नाही.

6. युवराज सिंह (Yuvraj Singh)

yuvraj-singh
टीम इंडियाचा ‘सिक्सर किंग’युवराज सिंह हा देखील यात असून त्यानेही 6 संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2008 ते 2010 या दरम्यान किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघातून खेळणारा युवराज याने यानंतर पुणे वारियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली डेअरडेव्हील्स (आता दिल्ली कॅपिटल्स), सनरायझर्स हैद्राबाद आणि मुंबई इंडियन्सकडून मैदान गाजवले.

आपली प्रतिक्रिया द्या