पूरग्रस्तांसाठी सहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा

704
file photo

राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक बोलावण्यात आली होती. राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर पूरग्रस्तांना सहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या पुरामुळे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक वर्गवारीनुसार मदत देण्यात येणार आहे.

पूरग्रस्तांना सहा हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली असून त्यातील 2 हजार 222 कोटींची मदत पूर्णपणे पडलेल्या घरांसाठी करण्यात येणार आहे. या रकमेतूनच घरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पिकांच्या नुकासानासाठी 2 हजार 88 कोटी, पडझड झालेल्या शाळांसाठी 125 कोटी, रस्त्यांच्या डागडुजीसाठी 576 कोटी, स्वच्छतेसाठी 79 कोटी, तात्पुरत्या छावण्यांसाठी 27 कोटी तर जनावरांच्या नुकसानासाठी 30 कोटी देण्यात येणार आहेत.

कोकण, नाशिक भागातील नुकसानासाठी 2150 कोटींची तरतूद करण्यात आली असून या पुरामुळे ज्या व्यावसायिकांचं नुकसान झालं आहे त्या प्रत्येक व्यावसायिकाला 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या