कसब आणि कौशल्य

32

<< दिसते त्य़ा पलिकडे >> << इद्रजीत खांबे    >>

 

Joel Meyerowitz हे स्ट्रीट फोटोग्राफीच्या इतिहासातील खूप महत्त्वाचं नाव. आज वयाच्या ८० व्या वर्षीदेखील ते अतिशय उत्साहानं फोटोग्राफी करतात. स्ट्रीट फोटोग्राफी या प्रकारात त्यांनी अतिशय वेगवेगळे प्रयोग केले. गॅरी विनोग्रँड या अजून एका महान अमेरिकन छायाचित्रकार त्यांचे मित्र. या दोघांनी वेडय़ासारखं फिरत न्यूयॉर्क शहराचे रस्ते, त्यावरील जनजीवन दस्तऐवजीकरण केलं.

आता आपण पाहात असलेल्या छायाचित्राकडे वळूया. हे छायाचित्र पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं. कोणते प्रश्न पडतात. एक माणूस खाली कोसळलाय. एका हातात मोठा हातोडा घेऊन त्याला ओलांडून जातोय. काय झालंय नेमकं. त्या हातोडावाल्या माणसाने त्याच्या डोक्यात हातोडा घातला असेल का की, दुसरं काही झालं असेल. असे डोकं भांडावून सोडणारे अनेक प्रश्न आपल्याला हे छायाचित्र पाहिल्यावर पडतात.

याव्यतिरिक्त अजून काही गोष्टी या छायाचित्रात आहेत. छायाचित्रातील सर्व माणसांच्या नजरा त्या पडलेल्या माणसाकडे एकत्र झाल्या आहेत. समोर एखादा माणूस कोसळला असताना कोणीच कसं पुढे जाऊन त्याला उचलायचा प्रयत्न करत नाही. ही मध्यमवर्गीय मानसिकता Joel Meyerowitz यांनी नेमकी पकडलीय.

असे प्रसंग जेव्हा रस्त्यावर घडतात तेव्हा स्वतःला समोर घडत असलेल्या घटनेपासून स्वतःला तटस्थ ठेवणं खूप अवघड असतं आणि हेच तर चांगल्या स्ट्रीट फोटोग्राफरचं कौशल्यही असतं. फोटोग्राफर जर समोरच्या प्रसंगात गुंतला तर तो छायाचित्र कसं काढणार. Joel Meyerowitz यांच्याच भाषेत सांगायचं तर चांगलं स्ट्रीट फोटोग्राफ हे मॅग्नेट ज्या वेगानं एकमेकांकडे आकर्षित होतात त्या वेगानं घडत असतं. ते पकडण्यासाठी आपल्यालाही तेवढीच चपळता दाखवावी लागते.

 

आपली प्रतिक्रिया द्या