उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर अहमदपूर येथे ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी करण्यात आली. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
अहमदपूर येथे कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ उपस्थित सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा दिल्या. यावेळी पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अजित पवार कार्यक्रम संपवून परत जातानाही कार्यकर्त्यांनी पुन्हा एक मराठा लाख मराठा मराठा, आरक्षण मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली.
मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हे एक दुःखदायक व दुर्दैवी घटना आहे .राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी या घटनेबद्दल जाहीर माफी मागतो असे यावेळी अजित पवार म्हणाले. या प्रकरणाची संपूर्ण व सखोल चौकशी करून जे दोषी आहे त्यांना कठोर शासन केले जाईल व अशा घटना राज्यात पुन्हा होऊ नये त्यासाठी संपूर्ण काळजी घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान अनेकांचे खिसे कापले गेले. पक्ष हाणणाऱ्यांच्या कार्यक्रमात खिसे कापले गेले, याचीच चर्चा सर्वत्र होत होती.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत चोरटयांनी अनेकांच्या खिशावर डल्ला मारला.