मुश्रीफ यांच्या वादग्रस्त पुस्तकाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा विरोध

1083

माजी पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या “Bhahminist Bimbed, Muslim Hanged” या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने तीव्र विरोध केला आहे. मंगळवारी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. या प्रकाशन कार्यक्रमावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला विरोध करण्याचा प्रयत्‍न केला असता पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे वतीने जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पुस्तक प्रकाशनाला विरोध करणाऱ्या प्रदेश प्रवत्का आनंद दवे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मयुरेश आर्गडे व इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सनदशीर मार्गाने केले जाणाऱ्या आंदोलनाला चिरडण्याची कृती करणाऱ्या पुणे‌ पोलिसांचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जाहीर निषेध केला आहे.

तसेच आता लढाई सुरू झाली आहे, आता माघार नाही. मुश्रीफ यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या कोर्टात यायला लावायचं, असा निर्धार संघटनेने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या