नवीन वर्षात श्रीमंत होण्यासाठी काय कराल?

82

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जुनं वर्ष सरू लागलं की नवीन वर्षात अनेकजण कसला न कसला संकल्प करतात. यात काहीजण फिटनेसकडे लक्ष दयायचं ठरवतात तर काहीजण फिरायला जायचा तर काहीजण एखादी वाईट सवय सोडण्याचा संकल्प करतात. तुम्ही पण जर असेच काही संकल्प करण्याचा विचार करत असाल तर थांबा. भलतासलता संकल्प करण्यापेक्षा श्रीमंत होण्याचा संकल्प करा. यासाठी खाली दिलेल्या आठ गोष्टी आवर्जून वाचा.

pay-bill

वेळेवर बिलं द्या

श्रीमंत व्हायचं असेल तर सर्वात आधी पैशांची बचत करा. वायफळ खर्च टाळा. वेळेवर बिलं द्या. नाहीतर उशीरा बिलं दिल्याने तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील आणि जर तुम्ही बिलं भरणं टाळत राहिलात तर वर्षाच्या शेवटी तुमच्या खिशाला चांगलाच फटका बसेल.

bank-statement

बँकेची स्टेटमेंट तपासत राहा

आपण नोकरी किंवा उद्योग करतो तो पैसे कमावण्यासाठी. यामुळे या पैशांचा वापर योग्य ठिकाणी आणि योग्य पध्दतीनेच होतोय ना हे पाहण्यासाठी बँकेची स्टेटमेंट तपासत राहा. बऱ्याचवेळा आपल्या खात्यातून पैसे कापले गेले आहेत हे आपल्याला माहितच नसत. यामुळे हे पैसे कुठे ,का, कशासाठी व किती कापले गेलेत ते बँकेची स्टेटमेंट तपासल्यावर कळतं.

read-financenews

बचत व गुंतवणूकीशी संबंधित वृत्त वाचा

बचत व गुंतवणुकीशी संबंधित बातम्या वाचल्याने सरकारच्या बचतीशी संबंधित नवीन योजना कळतात.

tex-chek

टॅक्सबाबत जाणून घ्या

आपले पैसे कोणत्या टॅक्ससाठी कापले जात आहेत याबदद्ल माहिती मिळवत राहा.

salary

पगाराकडे लक्ष द्या

कागदोपत्री मिळणारा पगार आणि हातात पडणारा पगार यात फरक असतो. पीएफ ग्रज्युईटी व इतर फंडांबरोबरच कर्जाची रक्कमही पगारातून कापली जाते. यामुळे या गोष्टींकडे लक्ष द्या. खर्च कसा कमी करता येईल व बचत करता येईल याची काळजी घ्या.

mutual-fund

गुंतवणूक करा

पैसा साठवल्याने वाढत नाही. तर गुंतवल्याने वाढतो हे समजून घ्या. आरडी, एफडी, म्युच्युअल फंड, एसआयपी या साऱख्या योजनांमध्ये पैसे गुंतवा. पण त्याआधी तज्ज्ञ व्यक्तीकडून माहिती करुन घ्या.

credit-card

क्रेडिट कार्डचा वापर टाळा

हातात पैशाच्या रुपाने क्रेडिट कार्ड आले कि खर्चाला उधाणच येतं. नाही म्हणता म्हणता गरज नसलेल्या वस्तूंची, कपड्यांची खरेदी केली जाते. वारेमाप खर्च होतो. त्याच बिल जेव्हा हातात पडतं तेव्हा डोळे पांढरे होण्याची वेळ येते. बँकेतील पैसा बघता बघता कमी होतो.

आपली प्रतिक्रिया द्या