स्मार्ट मास्क, आठ भाषांमध्ये मेसेज अनुवाद; कॉलही करणार

294

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे हा सगळ्यांच्या जीकनाचा अविभाज्य घटक बनला आहे. बाजारात सध्या विविध प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. पण सध्या सगळ्यांचे लक्ष्य वेधले आहे ते जपानच्या कंपनीने तयार केलेल्या स्मार्ट मास्कने. इंटरनेट कनेक्टेड हा मास्क जपानी भाषेचे अन्य आठ इतर भाषांमध्ये अनुवाद करू शकणार आहे.

जपानची स्टार्टअप कंपनी डोनट रोबोटिक्सने प्लॅस्टिकपासून तयार केलेल्या या सफेद रंगाच्या मास्कला सी मास्क असे नाक दिले आहे. रेग्युलर मास्कवर हा मास्क घालता येऊ शकतो. ब्लूटूथच्या माध्यमातून हा मास्क स्मार्टफोन किंका टॅबलेटशी कनेक्ट होऊ शकतो. संवादाचे टेक्स्ट मॅसेजमध्ये रूपांतर, कॉल करणे, युजरचा आवाज वाढविणे अशी फीचर्स यात आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला 5000 मास्क विक्रीसाठी बाजारात येणार आहेत. चीन, युरोप आणि यूएसमध्ये मास्क विक्रीसाठी ठेवण्याचा कंपनीचा विचार आहे. एका मास्कची किंमत 40 डॉलर म्हणजे जवळपास 3 हजार रुपये असणार आहे.

– ब्लूटूथच्या माध्यमातून हा मास्क स्मार्टफोन किं वा टॅबलेटशी कनेक्ट होऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या