रिअलमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स…

स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने (Realme) हिंदुस्थानमध्ये रिअलमी नार्जो 30 सिरीजमधील नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने Realme Narzo 30 Pro 5G आणि Realme Narzo 30A हे दोन फोन लॉन्च केले आहेत. रिअलमीचा Realme Narzo 30A हा सर्वात स्वस्त 5G फोन असून याची किंमत 10 हजारांपेक्षाही कमी आहे. या दोन्ही फोनबाबत अधिक जाणून घेऊया…

Realme Narzo 30 Pro 5G

हा फोन दोन व्हेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आला आहे 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 16 हजार 999 रुपये तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 19 हजार 999 रुपये एवढी आहे. काळ्या आणि चंदेरी रंगात हा फोन उपलब्ध आहे. 4 मार्चपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तुमच्याकडे आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड असेल आणि ईएमआयवर तुम्ही हा फोन घेणार असाल तर तुम्हाला 1000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंटही कंपनी देत आहे.

realme-narzo-3

फिचर्स

– 6.5 इंचाचा फुल एचडी + (1080 x 2400 pixels) डिस्प्ले
– आस्पेक्ट रेशियो 20:9, रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.7 प्रतिशत, टच सँपलिंग रेट 180 हर्ट्ज
– 5000 mAh ची दमदार बॅटरी (65 मिनिटात फोन 100 टक्के चार्ज होतो असा कंपनीचा दावा)

कॅमेरा

Realme Narzo 30 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असून सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

realme-narzo-1

Realme Narzo 30A

या फोनमध्ये कंपनीने 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज दिले आहे. मायक्रो कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येते. हा फोन दोन व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध आहे. यातील 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 8 हजार 999 रुपये आहे, तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. 5 मार्चपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

realme-narzo

फिचर्स

– 6.5 इंचाचा डिस्प्ले (720 x 1600 pixels)
– 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेन्सर
– सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 6000 mAh ची दमदार बॅटरी
– काळ्या आणि निळ्या रंगात उपलब्ध

आपली प्रतिक्रिया द्या