108 MP कॅमेरासह Xiaomi चे दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च, किंमत आणि फीचर्स

चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) Xiaomi Mi 11X आणि Xiaomi Mi 11X Pro हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केले आहे. शाओमीचे हे दोन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप फीचर्ससह लॉन्च करण्यात आले आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती आणि फीचर्सबाबत अधिक जाणून घेऊया…

Xiaomi Mi 11X –

xiaomi-mi-11x

Xiaomi Mi 11X स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. यात Adreno 650 GPU सोबत Qualcomm Snapdragon 870 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असे दोन व्हेरिएन्ट यात देण्यात आले आहेत. तसेच फोनमध्ये 4,520mAh ची दमदार बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. फोनचे वजन 196 ग्रॅम आहे.

कॅमेरा

Xiaomi Mi 11X स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर, 5 मेगापिक्सलचा मायक्रो शूटर देण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा यात आहे.

किंमत

Xiaomi Mi 11X च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएन्टची किंमत 29 हजार 999 रुपये, तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 31 हजार 999 रुपये आहे.

Xiaomi Mi 11X Pro –

xiaomi-mi-11x-pro

Xiaomi Mi 11X Pro स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिझोल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. फोनमध्ये Adreno 660 GPU सह Snapdragon 888 SoC प्रोसेसर देण्यात आले आहे. हा फोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएन्टसह लॉन्च करण्यात आला आहे. फोनमध्ये 4,520mAh ची दमदार बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली असून फोनचे वजन वजन 196 ग्राम आहे.

कॅमेरा

Xiaomi Mi 11X Pro मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मायक्रो शूटर देण्यात आला आहे. व्हिडीओ कॉल आणि सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेराही यात आहे.

किंमत

Xiaomi Mi 11X Pro च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 39 हजार 990 रुपये आणि 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 41 हजार 999 रुपये आहे. हा फोन 27 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या