बाहुबलीची ९ दिवसांत एक हजार कोटींची कमाई

सामना ऑनलाईन, मुंबई

अपेक्षेप्रमाणे बाहुबली-२ ने बॉक्स ऑफीस कलेक्शनचे सगळे विक्रम मोडीत काढत अवघ्या ९ दिवसात हजार कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने ८०० कोटी हिंदुस्थानात कमावले आहेत तर २०० कोटी परदेशात कमावले आहेत. ही कमाई करणारा बाहुबली-२ हा पहिला हिंदुस्थानी चित्रपट बनला आहे. चित्रपटांच्या बॉक्स ऑफीस कमाईवर बारकाईने नजर ठेऊन असलेल्या रमेश बाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.


हिंदी भाषेत डब बाहुबली-२ ने आत्तापर्यंत २६६.७५ कोटींची कमाई केली आहे. दुसरा आठवडा पूर्ण व्हायच्या आत हा चित्रपट ३०० कोटींची कमाई करेल असा अंदाज बॉक्स ऑफीसचा अभ्यास करणाऱ्या तरण आदर्श यांचं म्हणणं आहे. प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हिंदी बाहुबली-२ ने १९.७५ कोटींची कमाई केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या