स्मिता तांबे करतेय लघुपटाचे दिग्दर्शन

सामना ऑनलाईन, मुंबई

अभिनेत्री स्मिता तांबे आता लवकरच दिग्दर्शनाकडे वळली आहे. सध्या स्मिता एका लघुपटाचे दिग्दर्शन करत आहे. ‘दिग्दर्शन ही माझ्यासाठी फारच वेगळी जबाबदारी होती. ती योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे असं स्मिताने सांगितले आहेत. या लघुपटाची कथा गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात घर करुन होती. त्या कथेवर लघुपट करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.’ असे स्मिताने सांगितले.

या लघुपटात विनीत क़ुमार, जतिन जैस्वाल, विक्रम कोचर या कलाकारांसोबत गीलना ही रशियन अभिनेत्री देखील आहे.  स्मिताने मराठी मालिकांसोबतच जोगवा, ७२ मैल -एक प्रवास, गणवेष, तुकाराम, नातीगोती या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अजय देवगणच्या ‘सिंघम रिटर्न्स’ या चित्रपटातही तिचा छोटासा रोल होता.