आयसीसी कसोटी रँकिंग, विराटला स्पर्धा झुंजार स्मिथची

324

ऍशेस मालिकेतील दोन कसोटींनंतर आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी (रँकिंग) जाहीर केली असून त्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथने दुसरे स्थान परत मिळवले आहे. मात्र टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अव्वल स्थान स्वतःकडे राखण्यात यशस्वी ठरला आहे.

ऍशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथने दोन्ही डावांत शतके ठोकली होती. तसेच दुसर्‍या सामन्यात त्याने 92 धावांची खेळी केली. त्याच्या या दमदार खेळीच्या बळावर स्टीव्ह स्मिथने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. चेंडू कुरतडण्याप्रकरणी स्मिथला निलंबित करण्यात आले होते. ही शिक्षा संपल्यानंतर त्याने ‘ऍशेस’मधून पुनरागमन केले आणि आपले दुसरे स्थान परत मिळवले. याशिवाय श्रीलंकेचा दिमुथ करुणारत्ने याने न्यूझीलंडविरुद्धच्या विजयी खेळीमुळे चार स्थानांची उडी घेत आठवे स्थान पटकावले. त्याची कसोटी कारकीर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. गोलंदाजांमध्ये कसोटी पदार्पण करणार्‍या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने 5 विकेट घेण्याची किमया साधत पदार्पणातच 83 व्या स्थानी झेप घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या