गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी स्मृती इराणींच्या नावाची चर्चा

14

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

गुजरातमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवल्यानंतर भाजपमधून तिथे मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी स्मृती इराणींचं नाव सगळ्यात जास्त चर्चेत असल्याचं सांगितलं जात आहे. स्मृती इराणींकडे चांगले नेतृत्वगुण आहेत ,त्यामुळे त्यांचा या पदासाठी विचार केला जात असल्याचं सांगितलं जात आहे. अर्थात या संदर्भात भाजपकडून काहीही सांगण्यात आलेलं नाहीये. स्वत: इराणी यांनीही आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचं सांगितलं आहे.

इराणी यांच्याव्यतिरिक्त केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. मंडाविया हे पाटीदार समाजाचे नेते असून ते शेतकऱ्यांच्या जवळचे मानले जातात. पाटीदार आंदोलन आणि शेतकऱ्यांचे आंदोलन यामुळे भाजपपुढे मोठी डोकेदुखी निर्माण झाली होती. त्यामुळे मंडाविया यांच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत असलेलं तिसरं नाव हे वजूभाई वाला यांचं आहे. वाला हे सध्याचे कर्नाटकचे राज्यपाल असून त्यांनी गुजरात विधानसभेचे अध्यक्षपद भूषवलं आहे. यापूर्वी ते गुजरातमध्ये कॅबिनेट मंत्रीही होते, दांडगा अनुभव असल्याने त्यांना हे पद दिलं जाईल अशी शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या