पंचवीस किलोचे कपडे व दागिने घालून शूटिंग करते स्नेहा वाघ

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी व हिंदी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वाघ ही तिच्या लाईफ ओके वरील ‘शेर ए पंजाब- महाराजा रणजितसिंग’ या मालिकेसाठी तब्बल पंचवीस किलो वजनाचे कपडे व दागिने घालून शूटिंग करते आहे. या मालिकेत स्नेहा महाराजा रणजितसिंग यांची आई राज कौर यांची भूमिका साकारत आहे.

या मालिकेतील स्नेहाच्या भूमिकेसाठी २०० वर्षापूवीच्या काही चित्रांवरुन खास दागिने व कपडे तयार करण्यात आले आहेत. स्नेहासाठी तयार करण्यात आलेले दागिणे हे तब्बल पंधरा किलो वजनाचे आहेत. तर कपडे हे दहा किलो वजनाचे आहेत. तसेच या रोलसाठी तिला पूर्णपणे तयार व्हायला दोन ते अडीच तास लागतात. तसेच मेकअप व दागिने उतरविण्यासाठी देखील तितकाच वेळ लागतो, असे सेटवरील सूत्रांनी सांगितले.