लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. पण नगरमध्ये अनेक महिला या योजनेपासून वंचित राहिल्याने त्याना नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना कार्यक्रम यशस्वी करावा आशा आदेश जिल्हा प्रशासन दिले असताना दुसरीकडे मात्र अनेकांची नावेच न आल्यामुळे अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली. तर काहींना कागदपत्र व रेशन कार्ड दुरुस्त करून मिळण्यासाठी सर्व्हर बंद पडल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे या योजनेमध्ये अनेक महिलांना अजूनही मदत न मिळाल्यामुळे नाराजी पसरली आहे.
नगर जिल्ह्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेसाठी जिल्हास्तरावर नियोजन आखले गेले. प्रत्येक तालुक्यामध्ये यासाठी कमिटी नेमण्यात आली, तेथे सदस्य नियुक्त करण्यात आले, नगर जिल्ह्यामध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या गटाचे सदस्य यामध्ये महायुतीमध्ये अगोदर नाराजी पसरलेले आहे.
एकीकडे कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नाकी नऊ आलेली आहे. अनेक ठिकाणी सेतू केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रांगा होत्या. त्यातच सर्व्हर बंद झाल्यामुळे व सलगच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये अर्ज भरण्यामध्ये किंवा कागदपत्राची पूर्तता करण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झाली आहे.
हेलपाटे मारण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा हीच अवस्था सध्या पाहायला मिळत आहे. त्यात ज्यांना पैसे मिळाले त्यांना सुद्धा बँकेच्या बाहेर रांगेत उभे राहावे लागत आहे. नगर जिल्ह्यामध्ये शिर्डी या ठिकाणी सरकारच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, त्याची तयारी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आता कामाला लागलेली आहे. या ठिकाणी येण्यासाठी सर्व माहिती अगोदर घेतली जात आहे. कोणत्याही प्रकारे या ठिकाणी गोंधळ होता कामा नये याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आलेले आहे.