साठ्येची सामाजिक ‘जाणीव’

67

सामना ऑनलाईन ।

पोस्टरमेकिंग, वक्तृत्व, ओपन माइक, समूह नृत्य, ग्रुप डान्स, पथनाटय़ अशा विविध स्पर्धा साठय़े महाविद्यालयाच्या ‘जाणीव’ महोत्सवात पाहायला मिळाल्या. विले पार्लेच्या साठय़े महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत नवनव्या संकल्पना असलेला ‘जाणीव’ हा उपक्रम ‘लोग क्या कहेंगे’ अशा अनोख्या टॅगलाइनने राबवला होता. या महोत्सवात मुंबईसह ठाणे, मुंबई उपनगर व इतर जिह्यातील ५० महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण, जिल्हा समन्वयक मीनाक्षी सामंत, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. मिलिंद जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका मृदुला मराठे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी विनोद गवारे, गौतम म्हस्के, अनिल मांजे, प्रतिभा कांबळे, वैशाली वेलीस, गौरी देशपांडे, दर्पन आठवले यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात ‘रुईया’ महाविद्यालयाने ‘बेस्ट कॉलेज ट्रॉफी’ पटकावली.

आपली प्रतिक्रिया द्या