ऑस्ट्रेलियाने 16 वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लहान मुलांनी सोशल मीडियावर लॉग इन केल्यास 2.70 अब्ज रुपये दंड आकारण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी तसा कायदा मंजूर केला आहे. यात बिग टेकला लक्ष्य करणाऱ्या अत्यंत कठोर नियमांचा समावेश आहे. हा कायदा अल्पवयीन मुलांना इन्स्टाग्राम, फेसबुक आणि टीकटॉक सारख्या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करण्यापासून प्रतिबंधित करतो.
नियमांचे उल्लंघन करून सोशल मीडियावर लॉग इन केल्यास 32 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजेच 2,70,36,59,200 रुपये दंड भरावा लागेल. याची अंमलबजावणीबाबत चाचणी जानेवारीमध्ये सुरू होईल आणि एका वर्षात बंदी लागू होईल.
निर्बंधातून यूट्युबला वगळले
सोशल मीडियावरील बंदीमध्ये यूट्युबला सूट देण्यात आली आहे. हल्ली शाळांमध्ये शैक्षणिक वापरासाठी यूट्यूब मोठ्या प्रमाणात वापरले जाते. यामुळे यूट्युबला या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.