सोशल मीडियाचा उपयुक्त उपयोग

ज्या समाज माध्यमांतून आपण एकमेकांशी जोडले गेलो आहोत. त्यातून करीयरच्या संधीही उपलब्ध होतात.

फेसबुक, युटय़ुब, गुगल, ट्विटर ही प्रसाराची माध्यमे आज मोठय़ा प्रमाणात कार्यरत आहेत. ब-याचशा मोठय़ा कंपन्या, व्यवसाय प्रतिनिधी, संस्था, कलाकार आपल्या व्यवसायाची, संस्थेची किंवा आपल्या वैशिष्टय़पूर्ण कामाची ओळख लोकांना करून देण्यासाठी स्वतःचे फेसबुक पेज तयार करतात. यामुळे त्यांच्या कामाची जाहिरातही होते. जनसंपर्क वाढवण्यासाठी फेसबुक पेजची मदत होते.

ज्यांना सोशल नेटवर्किंग साईटवर काम करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी फेसबुक पेज तयार करणे, ब्लॉग तयार करणे आणि हे सगळ्यात माहितीची नियमित भर घालत राहणे किंवा दुसऱयांचे फेसबुक पेज सतत अपडेट करणे, इतरांचे ब्लॉग लिहून देणे, कार्यक्रमाची माहिती ट्विटर, फेसबुक, युटय़ुबवर अपलोड करणे यामध्येही करीयर करण्याचा मार्ग आहे. हा व्यवसाय अर्धवेळ किंवा पूर्णवेळही करता येण्यासारखा आहे. विशेष म्हणजे अनेक संस्थांचे, कंपन्यांचे, महत्त्वाच्या व्यक्तींचेही फेसबुक पेज आणि इतर समाजमाध्यमांवर माहिती, कार्यक्रम प्रसिद्ध करण्याचे कामही करता येते.

फेसबुक पेज तयार करण्याची माध्यमे

काही दुकानदारही त्यांच्या दुकानासंबंधित माहिती आपल्या फेसबुक पेजवर टाकू शकतात. ज्याद्वारे अनेक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचून दुकानाची जाहिरात होते.

काही कंपनी, इन्स्टिटय़ुटही जास्तीत जास्त लोकांनी संपर्क करण्यासाठी फेसबुक पेज तयार करतात.

अभिनेता, अभिनेत्री, राजकारणी, खेळाडूही स्वतःची कामाची शैली फेसबुक पेजद्वारे शेअर करतात.

सिनेमा, गाणं असं मनोरंजनात्मक कार्यक्रमांची माहितीही फेसबुक पेजवर देता येते.

महत्त्वाचे लेख, विनोद, शायरीही फेसबुक पेजवर पोस्ट केल्या जातात.

प्रशिक्षण संस्था

मॅक्झिम मीडिया आणि सेल्फहूड या दोन संस्था सोशल मीडिया तज्ञांच्या कार्यशाळेचे आयोजन करतात.

डिजिटल मार्केटिंग संस्था, ३०७, पॅराडाइज टॉवर, गोखले रोड, ठाणे (प.)

करीयर

कामाचे स्वरूप

कार्यक्रमाची प्रेसनोट फोटोसह, व्हिडीओसह योग्य पद्धतीने पोस्ट करणे, व्हॉटस्ऍपचा ग्रुप तयार करणे, त्याची भूमिका मांडणे, ग्रुप मेंबर निवडणे, रोजचे पोस्टिंग कसे असावे, नवीन कायद्याच्या अनुषंगाने झालेले बदल, नवीन नियम, फेसबुक पेज तयार करणे, फेसबुक पेजवर आपली माहिती पोस्ट करणे, घडामोडींचे आकर्षक पोस्टिंग, सोशल मीडियाचा वापर करून मतदारांशी सुसंवाद साधणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे.